Gautam Kotwal
Author and Visionary Thinker
Gautam Kotwal is a renowned writer whose works capture society, culture, and human values. With more than 55 published books, his writing continues to inspire countless readers.
गौतम कोतवाल
लेखक म्हणून परिचय
प्रसिद्ध लेखक — ५५ पुस्तकांचे लेखकखक
प्रसिद्ध लेखक ‘गौतम कोतवाल’ यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, सामाजिक सेवा, प्रशासकीय सेवा, सहकार, बँकिंग अशा वेगवेगळया क्षेत्रातील काही निवडक दिग्गज व्यक्तिंच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या खेडचे शिलेदार, कृषी आयडॉल्स, कृषिरत्न, कृषी आयकॉन्स, झिरो टू हिरो, आंबेगावचे शिलेदार, माझं आकाश माझी भरारी, महाराष्ट्राच्या सुकन्या, झेप, उडान, मराठी पाऊल पडते पुढे, खरेखुरे नायक, रिअल विनर्स, रिअल लाईफ विनर्स, मराठी पाऊल पडते पुढे, चतुरस्र-रवी चौधरी, सहकार भूषण, रिअल अचिव्हर्स, जोडी तुझी माझी, उद्योजक बना, अचिव्हर्स, न्यू अचिव्हर्स, कर्मयोगी, आखाती देशांतील इंडियन आयडॉल्स, बँकर्स व्हिजन, पाचपुते एक संघर्षगाथा, सेल्फ मेड पीपल, सेल्फ मेड मॅन, अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र, शुद्ध बीजापोटी, न्यू पाथफाईंडर, आयकॉन ऑफ महाराष्ट्र, आयडॉल ऑफ महाराष्ट्र, समर, माझी वसुंधरा, रणरागिनी, झिरो टू हिरो (न्यू), रिअल अचिव्हर्स (न्यू), कॅप्टन कूल, अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र 2024, भरारी, युद्ध, कॅप्टन कूल (इंग्रजी आवृत्ती), राजेंद्र पवार एक ऊर्जास्त्रोत, जनमानसांतील जिल्हाधिकारी, आऊट ऑफ बॉक्स, केडीएमसी-ओळख जुनी ध्यास नवा, प्रचिती, रथ जगन्नाथाचा, महाराष्ट्राचे कोहिनूर, प्राईड ऑफ महाराष्ट्र, शिल्पकार अशा 55 पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे.
1500 हून जास्त उद्योजक, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशोगाथा त्यांनी लिहिल्या आहेत. या कार्यासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांना साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
भारतीय मूळ असणाऱ्या दुबई, सिंगापूर, थायलंड या देशातील 200 हून अधिक उद्योजकांच्या यशोगाथा त्यांनी तरूणांना प्रेरणा देण्यासाठी पुस्तकरूपाने तरूणांसमोर आणलेल्या आहेत.
या दिग्गज लोकांच्या कार्याचा परिचय तरूणांना व्हावा व त्यांच्या कार्यातून तरूणांना प्रेरणा मिळावी हा गौतम कोतवाल यांचा यामागील उद्देश आहे.